'युपी'वर राज्य करण्यास 'सप' असमर्थ: अनुप्रिया

वृत्तसंस्था
रविवार, 23 ऑक्टोबर 2016

उत्तर प्रदेशमध्ये लोकशाही संपली असून तेथे राजेशाही आली आहे. मंत्र्यांना नियुक्ती केले जाते, हटविले जाते आणि पुन्हा नियुक्त केले जाते. आपल्याला हे समजायला हवे की समाजवादी पक्ष म्हणजे बुडणारी जहाज आहे. बहुजन समाजवादी पक्षाचा गैरव्यवहार आणि समाजवादी पक्षाच्या गुंडगिरी या सर्वांना अपना दल आणि भारतीय जनता पक्षाची युती चांगला पर्याय आहे.'
- अनुप्रिया पटेल

वाराणसी (उत्तर प्रदेश) - समाजवादी पक्षात सुरु असलेल्या गृहयुद्धाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी उत्तर प्रदेशवर आता आणखी राज्य करण्यास समाजवादी पक्ष समर्थ नसल्याचे समाजवादी पक्षाने सिद्ध केल्याचे म्हटले आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना अनुप्रिया पटेल म्हणाल्या, "उत्तर प्रदेशमध्ये लोकशाही संपली असून तेथे राजेशाही आली आहे. मंत्र्यांना नियुक्ती केले जाते, हटविले जाते आणि पुन्हा नियुक्त केले जाते. आपल्याला हे समजायला हवे की समाजवादी पक्ष म्हणजे बुडणारी जहाज आहे. बहुजन समाजवादी पक्षाचा गैरव्यवहार आणि समाजवादी पक्षाच्या गुंडगिरी या सर्वांना अपना दल आणि भारतीय जनता पक्षाची युती चांगला पर्याय आहे.' तसेच उत्तर प्रदेशमधील लोकांनी अपना दल आणि भारतीय जनता पक्षाची युती स्वीकारली असून ते युतीला बहुमताने निवडून देतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज त्यांचे काका आणि राजकीय वैरी शिवपाल यादव यादव यांच्यासह अन्य तीन मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. तसेच त्यांनी यावेळी आपणच मुलायमसिंह यांचे वारसदार असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: SP has proven it's incapable of ruling UP any more : Anupriya Patel