नाहीतर मी मरून जाईन; आमदाराला विधानसभेत अश्रू अनावर

नाहीतर मी मरून जाईन; आमदाराला विधानसभेत अश्रू अनावर

लखनौ- उत्तर प्रदेश विधानसभेत आज (ता.18) सोमवारी आझमगडमधील मेहनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कल्पनाथ पासवान ढसाढसा रडताना दिसले. उत्तर प्रदेश पोलिस आपली चोरीची तक्रार ऐकून घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. एका आमदाराची ही अवस्था असेल तर सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हात जोडून आमदार पासवान हे विधानसभा अध्यक्षांशी बोलत होते. आपल्या 10 लाख रूपयांची चोरी झाली पण पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला नसल्याचे पासवान यांनी विधानसभेत सांगितले. आमदार पासवान म्हणाले की, आज मी सभागृहात रडत आहे. उद्या संपूर्ण सभागृह रडेन. महोदय न्याय द्या. मी गरीब शेतकरी आहे. माझे पैसे मला मिळवून द्या, नाहीतर मी मरून जाईन.

पासवान म्हणाले की, मला घर बांधायचे होते. 7 जानेवारीला मी लखनौला गेलो आणि माझ्या बँक खात्यातून 10 लाख रूपये काढले. हे पैसे घेऊन मी सार्वजनिक बसने आझमगडला पोहोचलो. तिथे उतरल्यानंतर मी शारदा चौक येथील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेलो. मी तिथे समर्थकांसमवेत चहा पीत होतो. याचदरम्यान मी पैशांनी भरलेली बॅग तिथे ठेवली होती. हॉटेलमधून निघताना बॅग उचलली. त्यावेळी तिचे वजन कमी जाणवले. बॅग उघडली तेव्हा त्यातून पैसे गायब झाले होते. त्यानंतर हॉटेलमध्ये गोंधळ उडाला.

पोलिसांत तक्रार केली. पण त्यांनी हे प्रकरण नोंदवून घेतले नाही. जेव्हा पोलिसांनी आपली तक्रार नोंदवून घेतली नाही. तेव्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. त्यांच्या सांगण्यावरून एका पथकाने काही लोकांची चौकशी केली. पण त्यांनीही 10 लाख रूपये चोरीची तक्रार नोंदवून घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com