'या' 12 खासदारांवर होणार मोठी कारवाई; सभापतींनी चौकशीसाठी समितीकडं पाठवली नावं I Rajya Sabha MP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Speaker Jagdeep Dhankhar

ज्या 12 खासदारांची नावं चौकशीसाठी पाठवण्यात आली आहेत, त्यापैकी 9 काँग्रेस पक्षाचे (Congress Party) आणि तीन आम आदमी पक्षाचे आहेत.

Rajya Sabha MP : 'या' 12 खासदारांवर होणार मोठी कारवाई; सभापतींनी चौकशीसाठी समितीकडं पाठवली नावं

अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातल्यानंतर, आता राज्यसभेचे सभापती 'या' खासदारांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांनी 12 विरोधी खासदारांची नावं विशेषाधिकार समितीकडं पाठवली आहेत. या नेत्यांवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेषाधिकार भंगाचा आरोप आहे. ही समिती या आरोपांची चौकशी करून आपला अहवाल अध्यक्षांना सादर करेल, असं मानलं जात आहे.

संजय सिंह, शक्तीसिंह गोहिल, सुशील कुमार गुप्ता, संदीप कुमार पाठक, नाराभाई जे राठवा, सय्यद नासिर हुसेन, कुमार केतकर (Kumar Ketkar), इम्रान प्रतापगढ़ी, डॉ. एल हनुमंतय्या, फुलो देवी, जेबी माथेर आणि रंजीत रंजन आदी विरोधी पक्षांच्या खासदारांची चौकशी केली जाणार आहे.

ज्या 12 खासदारांची नावं चौकशीसाठी पाठवण्यात आली आहेत, त्यापैकी 9 काँग्रेस पक्षाचे (Congress Party) आणि तीन आम आदमी पक्षाचे आहेत. आपचे खासदार संजय सिंह म्हणाले, 'आम्ही विशेषाधिकाराचा भंग म्हणता येईल असं काहीही केलेलं नाही. आम्ही फक्त सत्य सांगितलं. कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला, जो सर्वसामान्य जनतेसोबत झाला आहे. नोटीस आल्यावर आम्ही त्याला उत्तर देऊ.'