वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नाही

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना पकडले गेल्यास पोलिसांकडून संबंधित वाहनचालकावर अनेकदा दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे असे करण्यास अनेक वाहनचालक घाबरतात. मात्र, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.  

नवी दिल्ली : वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना पकडले गेल्यास पोलिसांकडून संबंधित वाहनचालकावर अनेकदा दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे असे करण्यास अनेक वाहनचालक घाबरतात. मात्र, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.  

India driving 2 wheeler on call

कोच्ची येथील रहिवासी संतोष एम. जे. यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला. उच्च न्यायालयाचे ए. एम. शफीक आणि पी. सोमरंजन यांच्या खंडपीठाने याबाबतचा निष्कर्ष मांडला. केरळ उच्च न्यायालयाने सांगितले, की जोपर्यंत ड्रायव्हिंगमुळे लोकांची सुरक्षा धोक्यात येत नाही, तोपर्यंत त्याला बेकायदेशीर म्हणता येणार नाही. त्यामुळे वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हा गुन्हा नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे लोकांसाठी आणि सार्वजनिक संपत्तीसाठी धोक्याचे आहे, असे म्हणू शकत नाही. कोणताही कायदा असे करण्यापासून रोखत नाही, असा निष्कर्षही केरळ उच्च न्यायालायने मांडला. 

Web Title: Speaking on mobile is not illegal while driving