#WorldMentalHealthDay जगात 4 पैकी एक व्यक्ती मानसिक रूग्ण!

special article on World Mental Health Day
special article on World Mental Health Day

नवी दिल्ली : आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन! जगातील 4 व्यक्तींपैकी एक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक रूग्ण आहे. आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर मानवाला ही अवस्था पार करावी लागते. वेगवेगळ्या वयोमानानुसार या मानसिक आजाराची तीव्रता कमी जास्त होत राहते. 10 ते 19 वर्षांपर्यंत हा मानसिक आजार होण्याचे प्रमाण 16 टक्के आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या संशोधन व आकडेवारीनुसार जगात 45 कोटी लोक मानसिक आजाराशी लढा देत आहेत. 

कसा सुरू झाला जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन?
मानसिक आजारातून पुन्हा लोकांना आपल्या पायांवर खंबीरपणे उभे राहता यावे यासाठी वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ ही संस्था काम करते. याच संस्थेने 1992मध्ये जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनाची (World Mental Health Day) सुरवात केली. अंपगत्व येण्यासाठी मानसिक आजार हे प्रमुख कारण असल्याचे ही संस्था सांगते. मानसिक आजाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी ही संस्था मोठ्या प्रमाणात काम करते आणि यासाठीच दरवर्षी 10 ऑक्टोबरला मनासिक स्वास्थ्य दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे अजून एक मुख्य कारण म्हणजे कोणत्याही वयातील व्यक्तीला हा आजार होण्यापूर्वीच त्याला याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. 

किशोरवयीन अवस्था ही वयातील प्रमुख अवस्था असते व याच काळात आपल्यात अनेक बदल घडत असतात. या काळात शरिरात, मनात तसेच आयुष्यातील परिस्थितीमध्येही बरेच बदल होतात. शाळा सोडून कॉलेज सुरू होते, त्यानंतर नोकरीतील ताण-तणाव वाढतात, हे वय अनेक शंका उपस्थित होण्याचे असते. त्यामुळे याच वयात मानसिक आजार जडण्याची शक्यता जास्त असते. कित्येक वेळा हा आजार जडलेलासुद्धा कळत नाही व हेच टाळण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. 

मानसिक आजाराचे परिणाम
वयाच्या 14व्या वर्षी हा आजार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. पण अनेक वेळा या आजाराची माहिती व निदान होऊ न शकल्याने अनेकांचे जीव गेल्याच्या घटनाही आहेत. मानसिक आजार जडून आत्महत्या करण्याचे प्रमाणही किशोरवयात जास्त आहे. याचे प्रमुख कारण हे तणाव आहे. याचाच परिणाम म्हणजे मादक पदार्थांचे सेवन, रॅश ड्रायव्हिंग, ड्रग्जचे सेवन, असुरक्षित लैंगिक संबंध अशा आघोरी पर्यांयाकडे आजारी व्यक्ती झुकतो. 

मानसिक आजार हा जगातून कमी व्हावा यासा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन व वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ या संस्था मोठे कार्य करत आहेत. आजचा दिवस हा मानसिक रूग्णांना प्रोत्साहन देऊन त्यातून बाहेर काढण्याचा व त्याकडे जाणाऱ्या व्यक्तींना रोखण्याचा दिवस आहे.. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com