तृतीयपंथीयांसाठी रेल्वे आरक्षण अर्जात स्वतंत्र रकाना

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - रेल्वेने आरक्षण आणि ते रद्दच्या अर्जामध्ये आता तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रकाना सुरू केला आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयातर्फे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. याबाबत दिल्लीतील जमशेद अन्सारी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आरक्षण आणि ते रद्दच्या अर्जात तृतीयपंथीयांसाठी या प्रकारचा रकाना रेल्वेने समाविष्ट न केल्याचे राज्यघटनेतील अधिकारांचा भंग केल्याचे त्यात म्हटले होते. या तृतीयपंथीयांसाठी रेल्वेत स्वतंत्र कोच आणि जागा असाव्यात, अशी

मागणीही त्यांनी केली होती. या संदर्भात याचिकाकर्त्याला दिल्ली उच्च न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाकडे जाण्यास सांगितले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या 2014 च्या आदेशानुसार रेल्वेने त्यांच्या अर्जामध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रकान्याचा समावेश केला आहे. या रकान्याच्या माध्यमातून त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यात येत आहे.

Web Title: Special coloum for third gender in railway reservation form