अर्धकुंभमेळ्यात लहान मुलांसाठी विशेष ओळखपत्र

अर्धकुंभमेळ्यात लहान मुलांसाठी विशेष ओळखपत्र

प्रयागराज - प्रयागराज येथील अर्धकुंभमेळ्याला जगभरातील जवळपास बारा कोटी नागरिक भेट देण्याची शक्‍यता असल्याने या प्रचंड आकाराच्या सोहळ्यात लहान मुले हरविण्याची दाट शक्‍यता आहे. ही शक्‍यता लक्षात घेऊनच चौदा वर्षांखालील मुलांना ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन’ टॅग उत्तर प्रदेश पोलिस देणार आहेत. यामुळे मुले हरविल्यास त्यांना शोधणे सोपे जाणार आहे. 

पोलिसांनी यासाठी व्होडाफोन कंपनीचे सहकार्य घेतले असून, एकूण चाळीस हजार टॅग तयार करण्यात आले आहेत. कुंभमेळ्याच्या परिसरात सर्वत्र चौकशी केंद्र उभारले जाणार असून, त्या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यामुळे मुले हरविल्यास पालकांना पोलिसांशी संपर्क साधून मुलांना शोधणे सोपे जाणार आहे. याचबरोबर रात्रीच्या वेळी खबरदारीचा विशेष उपाय म्हणून सर्वत्र भव्य आकाराचे एलईडी स्क्रीनदेखील उभारले असून, त्याद्वारेही विविध माहिती नागरिकांसाठी वेळोवेळी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली विशेष नियोजन करण्यात आले आहे.

किन्नर आखाडा जुना आखाड्यात
कुंभमेळ्यातील आज (ता. १५) पहिल्या शाही स्नानात सहभागी होण्यासाठी किन्नर आखाडा काल अधिकृतपणे जुना आखाडाला जाऊन मिळाला. किन्नर हा वेगळा आखाडा म्हणून कायम राहणार असून, केवळ शाही स्नानासाठी हे दोन आखाडे एक झाले आहेत, असे या आखाड्याच्या प्रमुख महामंडलेश्‍वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी सांगितले. किन्नर आखाडा कुंभमेळ्यात प्रथमच सहभागी झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com