काश्मीरमध्ये पोलिस अधिकारी एके-४७ सह बेपत्ता

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील विशेष पोलिस अधिकारी इरफान अहमद दर हे एके-47सह अचानक बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी आज (बुधवार) दिली.

पोलिस अधिकारी अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या शोधासाठी शोध मोहिम राबविण्यात आली आहे. शिवाय, पोलिस अधिकारी त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. दर हे पम्पोर पोलिस ठाण्यात ते कार्यरत होते. मंगळवारपासून ते बेपत्ता झाले आहेत.

दरम्यान, हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेमध्ये दर हे सामील झाल्याचा दावा या संघटनेने केला आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय जवान औरंगजेब यांचे दहशतवाद्यांनी अपहरण करून खून केला होता.

Web Title: Special Police Officer Goes Missing With an AK-47 Rifle in Jammu And Kashmir