डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील आक्षेपार्ह ट्विटने हार्दिक पांड्या गोत्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

हार्दिक पंड्याने 26 डिसेंबर 2017 ला भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्याविरोधात डी. आर. मेघवाल यांनी कोर्टात याचिका दाखल करुन गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती.

जयपूर - टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी चांगलाच गोत्यात आला आहे. पांड्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश जोधपूरच्या विशेष अनुसूचित जाती/जमाती कोर्टाने दिले आहेत. 

hardik pandya

हार्दिक पंड्याने 26 डिसेंबर 2017 ला भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्याविरोधात डी. आर. मेघवाल यांनी कोर्टात याचिका दाखल करुन गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. पांड्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते, 'कोण आंबेडकर? ते ज्यांनी चुकीचा कायदा आणि संविधान बनवले किंवा ज्यांनी आरक्षण नावाचा रोग देशभर पसरवला.' या ट्विटमधून पांड्याने दलित समाजाच्या भावना भडकवल्या, असा आरोप मेघवाल यांनी केला आहे. हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कोर्टाने मान्य करत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title: special SC/ST court may file FIR against hardik pandya for his tweet on dr. babasaheb ambedkar.