असा अवलंबला गांधींनी अहिंसेचा मार्ग; 'हे' होते गांधींचे ब्रह्मचर्यावर मत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 जानेवारी 2019

राष्ट्राला आयुष्यभराचा स्वातंत्र्याचा मार्ग देणाऱ्या या महात्म्याची अंत्ययात्रा 8 किलोमीटर एवढी लांब होती. महात्मा गांधी यांच्याबद्दल अशाच काही न ऐकलेल्या गोष्टी..

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 70 वी पुण्यतिथी आहे. अहिंसावाद जगभर पसरविणाऱ्या या महात्माने स्वातंत्र्याची भीक न मागता ते आत्मसन्मानाने मिळविण्याची शिकवण भारतीय स्वातंत्र्यातून जगाला दिली. गांधी ही केवळ एक व्यक्ती नाही, तर एक काळ आहेत. 30 जानेवारी 1948 ला त्यांचा मृत्यू झाला. राष्ट्राला आयुष्यभराचा स्वातंत्र्याचा मार्ग देणाऱ्या या महात्म्याची अंत्ययात्रा 8 किलोमीटर एवढी लांब होती. महात्मा गांधी यांच्याबद्दल अशाच काही न ऐकलेल्या गोष्टी....

  •  महात्मा गांधी यांनी अहिंसा ही चळवळ राबवली, त्यासाठी सगळ्यात मुख्य कारण ठरले ते म्हणजे 1899 मधील एंग्लो बोएर युध्द. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना गांधी यांनी या युध्दामुळे जखमी झालेल्यांची सुश्रुशा केली होती. आरोग्य सेवक म्हणून त्यांनी यावेळी काम केले होते. याप्रसंगी त्यांनी पाहिलेली युध्दाची भीषणता त्यांना अहिंसेच्या मार्गावर नेण्यास कारण ठरली. 
  • अहिंसेसाठी महात्मा गांधी यांना जगभर नमन केले जाते. तरीही आजपर्यंत त्यांना शांती चा नोबेल पुरस्कार मिळालेला नाही. आतापर्यंत पाच वेळा त्यांचे नाव पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. 1937, 1938, 1939, 1947 आणि 1948 मध्ये गांधी यांचे नाव शांती च्या नोबेल पुरस्कारासाठी सुचविले गेले. 1948 ला नामांकनाच्या चार दिवसानंतर त्यांची हत्या करण्यात आली.
  • भारतातील 53 मुख्य मार्गांना महात्मा गांधी यांचे नाव आहे. केवळ देशातच नव्हे तर विदेशातही एकुण 48 मार्गांना गांधी यांचे नाव आहे.
  • आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी महात्मा गांधी काँग्रेस पक्ष भंग करण्यावर विचार करत होते.
  • महात्मा गांधी हे रोज 18 किलोमीटर चालत असे. यावरुन अंदाज लावला तर गांधी हे जगाचे दोन फेऱ्या पुर्ण करतील एवढे आयुष्यभर चालले. 
  • महात्मा गांधी यांच्यामुळे 4 खंड आणि 12 देशात नागरिक अधिकार चळवळीला सुरवात झाली होती. 
  • महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत 21 वर्ष वकील म्हणून कार्य केले. 1914 ला ते भारतात परतले. पण त्यांच्या कुटुंबातील बरेच लोक दक्षिण आफ्रिकेतच स्थायिक झालेत. ज्यात त्यांचे दुसरे अपत्य मणिलाल गांधी ही होते. महात्मा गांधी यांची पाचवी पीढीतील सदस्य हे द. आफ्रिकेतील विविध शहरात स्थायिक आहेत. 

    mahatma gandhi

महिलांचे अधिकार, ब्रह्मचर्य आणि सेक्स यावर गांधी यांचे विचार : 
गर्भ निरोध कार्यकर्ता व सेक्स शिक्षक मार्गरेट सैंगर यांनी महात्मा गांधी यांची त्यांच्या आश्रमात भेट घेतली. सैंगर या भारताच्या 18 दिवसीय दौऱ्यावर होत्या. या दरम्यान त्यांनी देशातील गर्भ निरोध व महिलांचे स्वातंत्र्य याविषयी डॉक्टर्स व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हा संवाद इतिहासकार रामचंद्र गुहा यांची बायोग्राफी 'फादर ऑफ द नेशन' यात लिहीला आहे.

सैंगर आणि गांधी यांची या गोष्टीला मान्यता होती की, महिलांना आणखी स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. त्यांनाच त्यांच्या विषयीचे निर्णय घेण्याचा अधिकार असायला पाहिजे. सैंगर यांच्या मते, 'गर्भ निरोधक हे महिलांच्या स्वातंत्र्याचा सगळ्यात सुरक्षित मार्ग आहे.' पण गांधी यांचे याविषयी विरुध्द विचार होते. त्यांच्या मते, 'महिलांनी आपल्या पतीला नाही म्हटले पाहिजे. पुरुषांनी आपल्या मोहावर नियंत्रण मिळविले पाहिजे. सेक्स केवळ वंश पुढे नेण्यासाठी केले गेले पाहिजे.'

mahatma gandhi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special Things About Mahatma Gandhi