मोदी सरकारकडून स्पेक्‍ट्रम गैरव्यवहार;कॉंग्रेसचा आरोप

मोदी सरकारकडून स्पेक्‍ट्रम गैरव्यवहार;कॉंग्रेसचा आरोप

नवी दिल्ली - यूपीए सरकारच्या काळात स्पेक्‍ट्रम गैरव्यवहाराच्या आरोपांनी होरपळलेल्या कॉंग्रेसने आता मोदी सरकारवर 69381 कोटी रुपयांचा स्पेक्‍ट्रम गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. या गैरव्यवहाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी केली जावी, अशी मागणीही कॉंग्रेसने केली आहे. 

"कॅग' अहवालाच्या आधारे कॉंग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी काल सत्ताधारी भाजपवर हल्ला चढवला. मागील चार वर्षे आणि आठ महिन्यांत मोदी सरकारने मायक्रोवेव्ह स्पेक्‍ट्रम वाटप करताना लिलाव करण्याऐवजी "प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वाच्या नावाखाली नियम पायदळी तुडवले आणि आपल्या मित्रांना स्पेक्‍ट्रम दिले. पवन खेडा म्हणाले, केंद्र सरकारने सर्वप्रथम 2015 मध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वाने स्पेक्‍ट्रम वाटप करताना नव्या नियमांच्या आधारे जुन्या पद्धतीने महसूल वसूल केला. यातून खासगी कंपन्यांना 45000 कोटी रुपयांचा फायदा पोचविण्यात आला. या एकूण प्रक्रियेतून गेल्या चार वर्षांत मोदी सरकारने 69381 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे, याची चौकशी होणे आवश्‍यक आहे. 

कर्नाटक सरकार स्थिरच 
कर्नाटकमधील डझनभर आमदारांच्या नाराजीमुळे धर्मनिरपेक्ष जनतादल आणि कॉंग्रेस आघाडीचे सरकार अस्थिर झाले आहे. भाजपने आपल्या आमदारांना कर्नाटकमधून बाहेर हलविल्याच्याही बातम्या झळकल्या आहेत. कॉंग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी मात्र हे सरकार स्थिर असल्याचा दावा केला. आमदारांच्या फोडाफोडीसाठी मोदी सरकार गैरव्यवहाराचा पैसा वापरत आहे. गोव्यातील सत्ता हे त्याचे उदाहरण आहे. कर्नाटकमधील कॉंग्रेस आघाडी सरकार याआधीही स्थिर होते, आहे आणि राहील, असा विश्‍वास पवन खेडा यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com