भाजपला संपविणे हेच माझे लक्ष्य- नरेश अग्रवाल

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

मी कोठेही जाणार नाही. मी अखिलेश यादव यांच्यासोबतच आहे. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त खोटे आहे. उत्तर प्रदेशातून भाजपला संपविणे हेच माझे लक्ष्य आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सहभागी होत असल्याचे वृत्त निराधार असून, उत्तर प्रदेशातून भाजपला संपविणे हेच माझे लक्ष्य असल्याचे, समाजवादी पक्षाचे (सप) नेते नरेश अग्रवाल यांनी सांगितले.

अग्रवाल भाजपमध्ये आज (सोमवार) अधिकृतरित्या सहभागी होणार याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, भाजप आणि बहुजन समाज पक्षात कडवी लढत पहायला मिळणार आहे. भाजपमध्ये अनेक नेत्यांचा इनकमिंग सुरु असताना, आता अग्रवाल हेही भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण, अग्रवाल यांनीच हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे. नरेश अग्रवाल हे राज्यसभेचे खासदार असून, पिता-पुत्रांच्या वादात त्यांनी अखिलेश यादव यांना पाठिंबा दिला होता.

अग्रवाल म्हणाले, की मी कोठेही जाणार नाही. मी अखिलेश यादव यांच्यासोबतच आहे. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त खोटे आहे. उत्तर प्रदेशातून भाजपला संपविणे हेच माझे लक्ष्य आहे. भाजपप्रवेशाबाबतचे वृत्त प्रसिद्ध करणाऱ्यांवर मानहानिचा दावा दाखल करणार आहे.

Web Title: SP's Naresh Agarwal rubbishes reports of defecting to BJP