कर्नाटकात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पाटील यांचा राजीनामा

SR Patil
SR Patil

बंगळुरू : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या असमाधानकारक कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एस. आर. पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 

पाटील यांनी 25 मे रोजी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठविला होता. सध्या राहुल गांधी परदेशात असल्या कारणाने अद्याप राजीनामा स्वीकारला गेलेला नाही. "काँग्रेसच्या उच्चायुक्तांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि उत्तर कर्नाटकमधील मतदारसंघांमध्ये विजय मिळविण्यासाठी पाठिंबा दिला." असे 69 वर्षीय पाटील यांनी रविवारी हुबळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

पाटील म्हणाले, की मी काँग्रेस उमेदवारांच्या विजयाची खात्री देऊ शकत नाही. म्हणून मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पक्षातील नेत्यांनी पाटील यांना अपमानास्पद वागणूक देण्याचे ठरवले

काँग्रेसच्या अन्य नेत्याने म्हटले, की कॉंग्रेस-जेडीएस गठबंधनाच्या चर्चेतही पाटील यांनी सहभाग घेतला नाही. त्याचबरोबर लिंगायत कोट्यांतर्गत उपमुख्यमंत्री होण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले होते. ते तेव्हापासून पक्षावर नाराज आहेत. नव्या चेहऱ्यांना सामावून घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे पाटील यांनी राजीनामा दिल्याची शक्यता आहे.

पाटील यांनी वरील वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना म्हटले की, पक्षामध्ये मी कुणावरही नाराज नाही किंवा कोणत्याही पदासाठी इच्छुक नाही. मी स्वतःची तत्त्वे जपणारा माणूस आहे आणि मी कधीच सत्तेसाठी लालची नव्हतो. मंत्रीपदाची अपेक्षा कधीही केली नाही. आजवर मी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता राहीलो आहे.

पक्षात चर्चा आहे, की विजयपूर, बगलकोट आणि गदगचे नेते हे पाटील यांनी पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार न केल्यामुळे त्यांच्यावर नाराज आहेत. कारण त्यांच्या अनुमानावरुन त्यांनी संपूर्णपणे बदामीवर लक्ष केंद्रित केले होते, जेथे सिद्धरामय्या उमेदवार होते. हनगडचे माजी आमदार विजयानंद कशपन्नवार यांनी त्यांच्या पराभवासाठी पाटील यांना जबाबदार धरत पक्षाच्या नेत्यांना त्यांना कोणतेही पद न देण्याची विनंती केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com