श्रीलंकेच्या नौसेने केली आठ मच्छीमारांना अटक

पीटीआय
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

कोलंबो/रामेश्‍वरम (पीटीआय) : श्रीलंकेच्या हद्दीत मच्छीमारी करणाऱ्या आठ भारतीय मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक करून त्यांच्या बोटी जप्त केल्या. अरीप्पूपासून 16 नॉटिकल अंतरावर बेकायदा मच्छीमारी करीत असल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती श्रीलंकेच्या नौदलाने आपल्या पत्रकात स्पष्ट केले आहे. 

अटक करण्यात आलेल्या भारतीय मच्छीमारांना वैद्यकीय चाचणीसाठी नौदलाच्या तळावर नेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आले, असे नौदलाने स्पष्ट केले आहे. तमिळनाडूच्या मच्छीमार विभागाने याबाबत सांगितले, की अटक केलेले सर्व मच्छीमार हे तुतीकोरीन येथील आहेत. यापूर्वी 10 ऑगस्ट रोजी 27 भारतीय मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली होती. श्रीलंकेच्या नौदलाने मच्छीमारांच्या चार बोटीही जप्त केल्या आहेत. 

Web Title: Sri Lankan navy arrested eight fishermen