श्रीनगरमध्ये चकमक ; 3 अतिरेकी ठार, एकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 5 मे 2018

''चट्टाबल परिसरात सुरु असलेली चकमक आता संपली असून, या परिसरातून तिघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत''.

- एस. पी. वैद्य,  पोलिस महासंचालक

श्रीनगर : श्रीनगरच्या चट्टाबल परिसरात झालेल्या चकमकीत 3 अतिरेक्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. मात्र, या कारवाईत केंद्रीय राखीव दलाचे (सीआरपीएफ) अधिकारी जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर नूरबाग येथील रस्ते अपघातात एकाचा मृत्यू झाला. 

ज्या परिसरात ही चकमक सुरु होती तो परिसर सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला. या चकमकीनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत राज्याचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी ट्विटवर याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, चट्टाबल परिसरात सुरु असलेली चकमक आता संपली असून, या परिसरातून तिघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.

यादरम्यान झालेल्या अपघातात अदिल अहमद यादू हे जखमी झाले होते. त्यांना श्रीनगरच्या एसएमएचएस रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, अशी माहिती जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी ट्विट करून दिली. 
 

Web Title: Srinagar encounter 3 militants 1 civilian killed