श्रीनगर-जम्मु राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस खुला

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

शुक्रवारपासून सतत हिमवृष्टी होत असल्याने श्रीनगर येथील विमानतळही दोन दिवस बंद ठेवण्यात आला होता. मात्र आता हवामानामध्ये सुधारणा होत असल्याने हवाई वाहतूकही सुरु झाली आहे

श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यास उर्वरित देशास जोडणारा श्रीनगर-जम्मु राष्ट्रीय महामार्ग आज (सोमवार) पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला झाला. तीन दिवस सतत झालेल्या हिमवृष्टीमुळे हा महामार्ग बंद झाला होता.

"अप्रतिहत हिमवृष्टीमुळे या रस्त्यावर काही ठिकाणी दरडी कोसळल्याने जमा झालेला राडारोडा बाजुला करण्यात आला आहे. रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला झाला असल्याची माहिती,' येथील वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

शुक्रवारपासून सतत हिमवृष्टी होत असल्याने श्रीनगर येथील विमानतळही दोन दिवस बंद ठेवण्यात आला होता. मात्र आता हवामानामध्ये सुधारणा होत असल्याने हवाई वाहतूकही सुरु झाली आहे. श्रीनगर-जम्मु महामार्ग हा व्यूहात्मकदृष्टयाही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

Web Title: Srinagar-Jammu highway reopens