लष्करे तैयबाचे दोन दहशतवादी अटकेत

jail file photo
jail file photo

श्रीनगर : पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या लष्करे तैयब्बाच्या दोन दहशतवाद्यांना आज बारामुल्ला जिल्ह्यात अटक करण्यात आली. पाकिस्तानकडून व्हिसा मिळवलेल्या या दहशतवाद्यांचा काश्‍मीर खोऱ्यातील घातपाती कारवायात सहभाग असल्याचे पोलिसाच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवाद्यांच्या मुसक्‍या बांधण्यात यश आले. दोघांची ओळख पटली असून, अब्दुल माजिद भट (रा. केरी) आणि मोहंमद अश्रफ (रा. पट्टण) अशी त्यांची नावे होत. इस्लामाबादजवळील बर्मा गावात या दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. दहशतवाद्यांचे केंद्र कमांडर हंजाला, अदनान आणि ओमर या कोड नावाने चालवले जात असल्याची माहिती या दहशतवाद्यांनी दिली. नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तांकडून या दोघांना व्हिसा दिला गेल्याचे उघडकीस आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com