संपूर्ण उत्तर भारत थंडीने गारठला

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

तापमान गोठण बिंदूच्या खाली

श्रीनगर: संपूर्ण उत्तर भारत थंडीने गारठला असून, रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली. काश्‍मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये अनेक ठिकाणी तापमान गोठण बिंदूच्या खाली गेले आहे. जम्मू आणि काश्‍मीर हे या हिवाळ्यातील रात्रीचे सर्वांत थंड ठिकाण ठरले असून, लेह आणि बनिहाल येथे शून्यापेक्षा कमी तापमान झाले.

तापमान गोठण बिंदूच्या खाली

श्रीनगर: संपूर्ण उत्तर भारत थंडीने गारठला असून, रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली. काश्‍मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये अनेक ठिकाणी तापमान गोठण बिंदूच्या खाली गेले आहे. जम्मू आणि काश्‍मीर हे या हिवाळ्यातील रात्रीचे सर्वांत थंड ठिकाण ठरले असून, लेह आणि बनिहाल येथे शून्यापेक्षा कमी तापमान झाले.

दरम्यान, श्रीनगरमध्ये रात्रीच्या तापमानात यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत कमी तापमान होते. येथे उणे 3.8 अंश तापमान नोंदले गेले. त्याशिवाय गुलमर्गमधील स्की रिसोर्ट हे काश्‍मीर खोऱ्यातील सर्वांत थंड ठिकाण ठरले असून, येथे उणे 4.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले.

हवामान खात्याच्या प्रवक्‍त्याने सांगितले की, राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहील.लेहमध्ये रात्री तापमानात दोन अंशांनी वाढ झाली असली तरी तेथे उणे 10.5 अंश तापमान होते आणि ते सर्वांत थंड ठिकाण ठरले. कारगिल येथे उणे 5.2 अंश सेल्सिअस तापमान होते.

चंडीगड : पंजाब आणि हरियानात रात्रीच्या तापमानात किंचित वाढ झाली असून, येथे 10.9 अंश तापमान होते. हरियानाच्या अंबाला येथे तापमानात तीन अंशांने वाढ झाली. येथे 11.8 अंश तापमान नोंदले गेले. हिसारला 9.8 अंश, तर नरनौलला 12.5 आणि रोहतकला 12.6 अंश तापमान होते.

शिमला : गेल्या तीन दिवसांपासून हिमाचल प्रदेशात थंडीचा कडाका वाढला असून, केलॉंग हे सर्वांत थंड ठिकाण ठरले आहे.

येथे सोमवारी उणे 2 अंश तापमान होते. डोंगराळ भागात आणि नदीच्या परिसरात दाट धुक्‍यामुळे येथील जनजीवन विस्कळित झाले होते. यामुळे समोरील दृश्‍यताही कमी झाली होती. राज्यात शीतलहर कायम असून दिवसा येथील वातावरण अंशतः ढगाळ तर रात्री आकाश निरभ्र होते. पश्‍चिमी गडबडीमुळे तापमानात घट झाली असली तरी, रात्रीच्या तापमानात एक ते दोन अंशांने वाढ झाली आहे. बर्फवृष्टी होईल या आशेने मनाली येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. येथे उणे 0.4 अंश आणि कुलूच्या सेओबग येथे एक अंश तापमान होते. त्याशिवाय कुलूच्या भूंतर येथे 1.5 अंश, तर मंडीच्या सुंदरनगरला आणि किन्नूरच्या काल्पामध्ये दोन अंश तापमान होते. राज्यात पाऊस अथवा बर्फ पडल्याचे कोणतेही वृत्त नाही, असे हवामान खात्याचे प्रवक्‍त्याने सांगितले.

Web Title: srinagar news The whole of northern India has cooled down