अस्वस्थ श्रीनगरमधील जनजीवन पूर्वपदावर...

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

श्रीनगर - जम्मु काश्‍मीरमधील फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदामुळे राज्यामधील इतर ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले आहे. मात्र जम्मु काश्‍मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आल्याचे वृत्त आज (गुरुवार) सूत्रांनी दिले. फुटीरतावाद्यांनी राज्यात पुकारलेल्या बंदाचा कालावधी आता सुमारे चार महिने झाला आहे.

गेल्या आठवड्यापासून अनेक नागरिकांनी बंदाचे आवाहन झुगारुन लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे खोऱ्यामधील जनजीवन सुरळीत होण्यासही प्रारंभ झाला आहे. शहरामधील खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही हळुहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय, अनंतनाग, बारामुल्ला व श्रीनगर या जिल्ह्यांना जोडणारी वाहतूकही सुरु झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याचबरोबर, शहरातील लाल चौकाचा मध्यवर्ती भाग व शहराबाहेरील भागामधील अनेक दुकानेही उघडी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अर्थात, श्रीनगर वगळता खोऱ्यामधील इतर ठिकाणी अद्याप तणावग्रस्त परिस्थिती असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. गेल्या 8 जुलै रोजी भारतीय लष्कराने हिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या बुऱ्हान वणी याला यमसदनी पाठविल्यानंतर येथील फुटीरतावादी संघटनांनी बंद पुकारला आहे.

Web Title: srinagar returns to normalcy