थोडं थांबा! पुढे आणखी मजा येणार आहे : राहुल गांधी

Rahul Gandhi
Rahul Gandhi

अमेठी : 'आता कुठे खरी गंमत सुरू झाली आहे..' हे विधान आहे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे..! तेही देशाच्या राजकारणात सध्या केंद्रस्थानी असलेल्या राफेल कराराच्या वादासंदर्भात.. यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये काँग्रेसने केंद्र सरकारला राफेल कराराच्या मुद्यावरून चहुबाजूंनी घेरण्याची व्यूहरचना आखली असल्याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले आहेत. 

अमेठीमध्ये राहुल गांधी यांनी काल (सोमवार) रात्री पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारविरोधात काँग्रेसच्या सध्याच्या व्यूहरचनेबद्दलही काही विधाने केली. 'खरी गंमत आता कुठे सुरू झाली आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची प्रत्येक कृती 'चोरीची' आहे, हे आम्ही येत्या काही महिन्यांमध्ये सिद्ध करून दाखवूच' असा विश्‍वास राहुल यांनी व्यक्त केला. राफेल करारामध्ये अनिल अंबानी यांच्या कंपनीला संधी देऊन पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचाराला आश्रयच दिला आहे, असा आरोप राहुल यांनी केला. 

राहुल म्हणाले, "भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी आलेल्या माणसानेच अनिल अंबानी यांना 30 हजार कोटी रुपयांचा करार करून दिला. आत्ता तर ही सुरवात आहे! आता बघा.. मजा येईल.. येत्या दोन-तीन महिन्यांत तुम्हाला अशी गंमत दाखवतो.. राफेल करार, ललित मोदी, विजय मल्ल्या, नोटाबंदी, गब्बरसिंग टॅक्‍स या पंतप्रधान मोदी यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये चोरीचाच प्रकार आहे. एक-एक करून आम्ही हे सिद्ध करू, की मोदी चौकीदार नाही, चोर आहेत!'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com