छत्तीसगडच्या जंगलात सररकार लावणार फळझाडे 

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जुलै 2019

घनदाट जंगलांनी समृद्ध असलेल्या छत्तीसगडच्या बस्तर विभागात वनक्षेत्र कमी होत असून, त्यावर मात करण्यासाठी जंगलाच्या अंतर्भागात फळझाडे लावण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे. वाढती लोकसंख्या आणि सरकारी अनास्थेमुळे जंगलाचे क्षेत्र घटत चालले असून, दक्षिण विभागातील कोंडागावच्या अंतर्गत असलेल्या माकडी विभागात आता फक्त 27 हजार 228 हेक्‍टर जंगल उरले आहे. 

कोंडागाव (छत्तीसगड) ः घनदाट जंगलांनी समृद्ध असलेल्या छत्तीसगडच्या बस्तर विभागात वनक्षेत्र कमी होत असून, त्यावर मात करण्यासाठी जंगलाच्या अंतर्भागात फळझाडे लावण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे. वाढती लोकसंख्या आणि सरकारी अनास्थेमुळे जंगलाचे क्षेत्र घटत चालले असून, दक्षिण विभागातील कोंडागावच्या अंतर्गत असलेल्या माकडी विभागात आता फक्त 27 हजार 228 हेक्‍टर जंगल उरले आहे. 

जंगल कमी होत चालल्यामुळे सरकारने अंतर्भागात स्थानिक फळझाडे लावण्याचा निर्णय केला असून, तसे कामही सुरू केले आहे. त्यात आंबा, जांभूळ, सीताफळ, चिंच, मोह आदी वृक्षांचा समावेश असेल. ही झाडे लावल्यामुळे जंगलाला त्याचे पूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त होण्याची सरकारला आशा आहे. आत्तापर्यंत 33 हजार रोपे लावण्यात आल्याची माहिती माकडीचे विभागीय अधिकारी पी. आर. नायक यांनी दिली.

केवळ फळझाडेच लावली जाणार नसून, स्थानिकांच्या आहाराचा भाग असलेल्या भाज्यांच्या बियाही वाटल्या जात आहेत. त्यामुळे परसातच भाज्या मिळू शकतील. सध्या साल, मोह, तेंदू आदी वनोत्पादनांतून वन खात्याला महसूल मिळतो. आता फळझाडे लावून त्यातूनही उत्पन्न मिळविले जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Government plans to plant Fruit trees in Chhattisgarh forests