विजय मल्ल्याला भारत आणण्यासाठी मोदी सरकारची नवीन खेळी

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

सरकारी विश्रामगृहाचे जेलमध्ये रुपांतर का?
भारतीय जेल अस्वच्छ आणि खराब आहेत, असा युक्तीवाद मल्ल्याच्या वकिलांनी ब्रिटीश न्यायालयात केला होता. त्यामुळे भारत सरकारने मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी सरकारकरवी ही खेळी केली आहे. मल्ल्याच्या सोईसाठी नाही, तर केंद्र सरकारला मदत आणि ब्रिटीश कोर्टाला दाखवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सरकारी विश्रामगृह जेलमध्ये बदलण्यास तयारी दर्शवली आहे. केंद्र आणि राज्य सरकार देशाच्या कोणत्याही ठिकाणाचे जेलमध्ये रुपांतर करु शकतात. त्यामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणात जेलचा अडथळा येत असेल, तर विश्रामगृहाचे रुपांतर तुरुंगात करण्याची आमची तयार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई: हजारो कोटींचे कर्ज बुडवून फरार असलेल्या विजय मल्ल्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता गेस्ट हाऊस म्हणजेच विश्रामगृह देण्याची तयारी दर्शवली आहे. मल्ल्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला महाराष्ट्र सरकारने प्रतिसाद देत सरकारी विश्रामगृह जेलमध्ये तयार असल्याचे महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला सांगितले आहे. 

सरकारी विश्रामगृहाचे जेलमध्ये रुपांतर का?
भारतीय जेल अस्वच्छ आणि खराब आहेत, असा युक्तीवाद मल्ल्याच्या वकिलांनी ब्रिटीश न्यायालयात केला होता. त्यामुळे भारत सरकारने मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी सरकारकरवी ही खेळी केली आहे. मल्ल्याच्या सोईसाठी नाही, तर केंद्र सरकारला मदत आणि ब्रिटीश कोर्टाला दाखवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सरकारी विश्रामगृह जेलमध्ये बदलण्यास तयारी दर्शवली आहे. केंद्र आणि राज्य सरकार देशाच्या कोणत्याही ठिकाणाचे जेलमध्ये रुपांतर करु शकतात. त्यामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणात जेलचा अडथळा येत असेल, तर विश्रामगृहाचे रुपांतर तुरुंगात करण्याची आमची तयार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी लवकरच सुनावणी होणार आहे, त्याबाबतच्या रणनीतीसाठी गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांची आज बैठक झाली. मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत येत्या 4 डिसेंबरला सुनावणी होणार आहे, मात्र त्यापूर्वीचा युक्तीवाद 20 नोव्हेंबरला होईल. दरम्यान, सरकारने विजय मल्ल्याला ठेवण्यासाठी मुंबईतील आर्थर रोड जेलची चाचपणी केली आहे. याच जेलमध्ये 12 नंबरच्या बराकमध्ये पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आले होते. या बराकमध्ये वातानुकुलित यंत्रणा सोडून सर्व व्यवस्था युरोपीय जेलप्रमाणेच आहेत.

Web Title: State suggests Guesthouse arrest for Vijay Mallya