भोपाळ ते इंदूर प्रवास करून झाडली महिला एसआयवर गोळी; स्वतः केली आत्महत्या

Station in-charge fired shots at the female SI in Madhya pradesh
Station in-charge fired shots at the female SI in Madhya pradeshStation in-charge fired shots at the female SI in Madhya pradesh

इंदूर : भोपाळमध्ये तैनात असलेल्या स्टेशन प्रभारीने इंदूरला पोहोचल्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षात तैनात असलेल्या महिला एसआयवर गोळ्या (Firing) झाडल्या. यानंतर स्टेशन प्रभारीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. महिला एसआयला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (Station in-charge fired shots at the female SI in Madhya pradesh)

महिला एसआयवर गोळी झाडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच अतिरिक्त आयुक्त घटनास्थळी पोहोचले. जखमी महिला एसआयला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमदर्शनी हे प्रकरण प्रेमप्रकरणाचे असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Station in-charge fired shots at the female SI in Madhya pradesh
एकनाथ शिंदे आपल्या ‘त्या’ विधानावरून पलटले; स्पष्टीकरण देत म्हणाले...

श्यामला हिल्स भोपाळचे स्टेशन प्रभारी हकमसिंग पवार शुक्रवारी दुपारी इंदूरच्या रिगल चौकात असलेल्या पोलिस नियंत्रण कक्षात पोहोचले होते. येथे ते महिला पोलिसाला भेटण्यासाठी आले होते. स्टेशन प्रभारी हकमसिंग पवार यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने महिला पोलिसावर गोळी (Firing) झाडली. यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

माहिती मिळताच एफएसएल आणि इतर पथके तपासासाठी घटनास्थळी पोहोचले. पोलिस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांनीही नियंत्रण कक्षात पोहोचून घटनेची माहिती घेतली. मृत हकमसिंग पवार हे यापूर्वी इंदूरमधील खुडैल येथे तैनात होते. यानंतर ते खरगोनच्या महेश्वर आणि भिकनगावमध्येही टीआय झाले होते.

Station in-charge fired shots at the female SI in Madhya pradesh
मुख्यमंत्र्यांनी हलक्यात घेतले ‘पेन ड्राइव्ह’ कांड; आमदारांची माहिती कशी मिळाली नाही?

प्रेमप्रकरणातून हल्ला?

भोपाळमध्ये (bhopal) पोस्टिंग असलेले हकमसिंग पवार इंदूरला आले. येथील कार्यालयात तैनात असलेल्या महिला एएसआयसोबत त्यांचा वाद झाला. यानंतर एएसआयला गोळी मारून हकमसिंग पवार यांनी स्वत:वर गोळी (Firing) झाडली. प्रथमदर्शनी हे प्रेमप्रकरण असल्याचे दिसते, असे पोलिस आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा यांनी सांगितले.

जखमीची प्रकृती धोक्याबाहेर

जखमी महिला पोलिस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली जात आहे. भोपाळमध्ये हकमसिंग पवार यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली आहे. घटनेशी संबंधित वस्तुस्थितीची माहिती घेतली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com