स्टॅच्यू ऑफ युनिटीने टाकले स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला मागे

वृत्तसंस्था
शनिवार, 7 डिसेंबर 2019

नोव्हेंबर 2018 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये 74 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात स्टॅच्यू ऑफ युनिटीला रोज जवळपास 15,036 पर्यटक भेट देतात अशी नोंद झाली आहे.

अहमदाबाद : सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटीने एका वर्षातच देशातच नव्हे तर जगभरात मोठी ख्याती कमावली आहे. नुकतेच स्टॅच्यू ऑफ युनिटीने अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला मागे टाकले आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीला दररोज तब्बल 15 हजार पर्यटक भेट देतात. 

नोव्हेंबर 2018 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये 74 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात स्टॅच्यू ऑफ युनिटीला रोज जवळपास 15,036 पर्यटक भेट देतात अशी नोंद झाली आहे. तसेच सुटीच्या दिवशी हा आकडा जवळपास 22,430 पर्यटकांवर जातो. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला रोज जवळपास दहा हजार माणसे भेट देतात. 

Image result for statue of unity

स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले गृहमंत्री होती. 182 मीटरचा असलेला हा पुतळा जगातील सर्वांत उंच पुतळा आहे. गुजरातमध्ये नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाजवळ हा बांधला आहे. गेल्यावर्षी 31 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statue of Unity surpasses USAs Statue of Liberty in daily number of visitors