सुरक्षित राहायचे असेल, तर गायीपासून लांब राहा : आझम खान

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जुलै 2018

रामपूर (उत्तर प्रदेश) : अलवर येथील कथित गोरक्षकांनी केलेल्या हत्येनंतर सुरू असलेल्या वादात समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनीही आता उडी घेतली आहे. 'मुस्लिमांना सुरक्षित राहायचे असेल, तर त्यांनी गायीपासून दूर राहावे', असा 'सल्ला' खान यांनी दिला. 

राजस्थानमधील अलवर येथे गो-तस्करीच्या संशयावरून हिंसक जमावाने रकबर खान या 28 वर्षीय तरुणाची हत्या केली. यानंतर देशभरातून कथित गोरक्षकांच्या झुंडशाहीचा निषेध होत आहे. 'समाजवादी पक्षाचा मुस्लिम चेहरा' अशी ओळख असलेल्या आझम खान यांनीही या प्रकरणी भाष्य केले. 

'दुग्धव्यवसाय आणि गायींचा व्यवसाय करण्यापासून मुस्लिम समाजाने दूर राहावे. येणाऱ्या पिढीच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचे आहे', असे वक्तव्य आझम खान यांनी केले. "दुग्ध उत्पादन किंवा तत्सम व्यवसायाशी संबंधित असलेल्या मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे.. की पुढच्या पिढीच्या सुरक्षेसाठी तुम्ही गायींपासून दूर राहा. 'गायीला हात लावल्यास परिणामांना सामोरे जा', अशी धमकी एखादा कट्टर धार्मिक नेता देतो, तेव्हा स्वत:च्या सुरक्षेसाठी आपण यापासून दूर राहिलेलेच चांगले', असे खान म्हणाले. 

Web Title: Stay away from Cow for safety of future generations, says Azam Khan