कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती

पीटीआय
बुधवार, 10 मे 2017

हेरगिरीच्या आरोपावरून नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज स्थगिती दिली.

नवी दिल्ली - हेरगिरीच्या आरोपावरून नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज स्थगिती दिली.

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज ही स्थगिती दिली. कुलभूषण जाधव नौदलातून निवृत्त झाल्यानंतर व्यवसायानिमित्त इराण येथे गेले होते, तेथून त्यांचे अपहरण करण्यात आले होते, अशी बाजू भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडली होती. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तानने गेल्या वर्षी जाधव यांना कथित हेरगिरीप्रकरणी अटक करून त्यांच्यावर लष्करी न्यायालयात खटला चालविला. न्यायालयाने त्यांना या प्रकरणी दोषी धरत गेल्या महिन्यात फाशीची शिक्षा सुनावली होती. यामुळे दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता. जाधव हे नौदलात सेवेला होते, मात्र सध्या त्यांचा सरकारशी कोणताही संबंध नसल्याचा दावा भारताने केला होता.

Web Title: Stay on death penalty of Kulbhushan Jadhav by international court