मर्यादेत रहा ; 'जेडीयू'चा केंद्रीयमंत्र्यांना इशारा

Stay within limits JDU warns Union Minister Kushwaha
Stay within limits JDU warns Union Minister Kushwaha

नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (आरएलएसपी) प्रमुख उपेंद्र कुशवाह यांच्याकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर आता संयुक्त जनता दलाकडून (जेडीयू) उपेंद्र कुशवाह यांना 'मर्यादेत रहा', अशा शब्दांत इशारा देण्यात आला आहे. 

नितीशकुमार यांच्या जेडीयूने 2015 च्या विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर नितीशकुमार हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर काही दिवसांपासून कुशवाह यांच्याकडून नितीशकुमार यांच्यावर टीका केली जात आहे. या टीकेला जेडीयूनेही प्रत्युत्तर दिले. जेडीयूने सांगितले, की मर्यादेत रहा. 

याबाबत जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष बशिस्था नरेन सिंग यांनी सांगितले, की कुशवाह यांनी अप्रासंगिक, पूर्वग्रहित असे वक्तव्य केले. त्यांना अशी वक्तव्ये करण्याची सवय लागली आहे. आमच्या पक्षाने यापूर्वी कधीही पूर्वाग्रहसारखी वक्तव्ये केली नाहीत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com