ह्रदय शस्त्रक्रियेसाठी 'स्टेंट' आता सामान्यांच्या आवाक्‍यात

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

ह्रदय शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या स्टेंटच्या पुरवठा साखळीत अवाजवी किंमत वाढत जाते. याची रुग्णांना माहिती नसते आणि याचाच फायदा घेऊन डॉक्‍टर रुग्णाला मोठ्या खर्चात पाडतात. जनहित लक्षात घेऊन हे प्रकार टाळण्यासाठी स्टेंटच्या किंमतीवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
- राष्ट्रीय औषधे किंमत प्राधिकरण (एनपीएए) 
 
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ह्रदयविकार असलेल्या नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ह्रदय शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या स्टेंटच्या किंमतीत 85 टक्‍क्‍यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. धातूच्या स्टेंटसाठी 7 हजार 260 रुपये आणि विघटनशील स्टेंटसाठी 29 हजार 600 रुपये कमाल किमतीची मर्यादा आता घालण्यात आली आहे. 

राष्ट्रीय औषधे किंमत प्राधिकरणाने (एनपीपीए) जाहीर केलेल्या आदेशात म्हटले आहे, की सार्वजनिक हित विचारात घेऊन धातूच्या स्टेंटसाठी किमतीची मर्यादा 7 हजार 260 रुपये ठेवण्यात आली आहे. औषधाने विघटित होणाऱ्या स्टेंटसाठी किंमत मर्यादा 29 हजार 600 रुपये ठेवण्यात आली आहे. सरकारने याआधीच हे स्टेंट अत्यावश्‍यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत समाविष्ट केले आहेत. 

स्टेंट नलिकेच्या आकाराचा असतो आणि तो ह्रदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये बविण्यात येतो. यामुळे ह्रदयविकार असलेल्या नागरिकांवर उपचार करताना रक्तवाहिनी खुली राहण्यास मदत होते. या स्टेंटची किंमत 25 हजार ते 1.98 लाख रुपये आहे. "एनपीपीए'ने संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालये सर्वाधिक नफा स्टेंटमध्ये कमावतात. या नफ्याचे प्रमाण काही वेळा 654 टक्‍क्‍यांपर्यंत जाते. 

ह्रदय शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या स्टेंटच्या पुरवठा साखळीत अवाजवी किंमत वाढत जाते. याची रुग्णांना माहिती नसते आणि याचाच फायदा घेऊन डॉक्‍टर रुग्णाला मोठ्या खर्चात पाडतात. जनहित लक्षात घेऊन हे प्रकार टाळण्यासाठी स्टेंटच्या किंमतीवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
- राष्ट्रीय औषधे किंमत प्राधिकरण (एनपीएए) 
 
Web Title: stent within reach now