ईदच्या दिवशी जम्मू-काश्मिरमध्ये दगडफेक, आंदोलकांकडून चिथावणी

वृत्तसंस्था
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

श्रीनगर : बकरी ईद उत्साहात साजरी करून झाल्यानंतर जम्मू-काश्मिरमध्ये आंदोलकांकडून सुरक्षा दलावर दगडफेक करण्यात आली. तसेच जमावाकडून पाकिस्तान व इसिसचे झेंडे फडकविण्यात आले. जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न जवानांकडून होत आहे, तसेच अनंतनाग येथे पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. 

आज (ता. 22) सकाळी श्रीनगर येथे अनेक ठिकाणी बकरी ईदनिमित्त नमाज पठाण झाले. त्याचवेळी आंदोलक जमा झाले. नमाज पठणासाठी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांवरच दगडफेक सुरू करण्यात आली, तसेच पाकिस्तान व इसिसचे झेंडे दाखवून आंदोलकांनी जवानांना चिथावणी दिली. 

दरम्यान, कुलगाम येथे तणावाचे वातावरण असून, तेथे ईदगाहच्या बाहेर दहशतवाद्यांनी एका पोलिसावर गोळीबार केल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.  

Web Title: stone pelting in shrinagar on bakari eid