काश्मीरी युवक देशासाठी दगडफेक करतात- फारुख अब्दुल्ला

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

श्रीनगरः काश्मीरचे युवक पर्यटनाचा विकास व्हावा ही मागणी घेऊन दगडफेक करत नाहीत तर ते आपल्या देशासाठी दगडफेक करतात, असे राष्ट्रीय कॉन्फरन्सचे अध्यक्ष व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी आज (बुधवार) बोलताना या दगडफेकीचे समर्थन केले आहे.

सोनावर मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी बोलताना अब्दुल्ला म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मरी युवकांना प्रश्न केला होता की, तुम्हाला टुरिजम हवे की टेररिजम? परंतु, पंतप्रधानांनी हा प्रश्न पहिला समजावून घ्यावा. काश्मीरमधील नागरिकांचे टुरिजम हे सर्वस्व आहे. यामुळे काश्मीरमधील युवक पर्यटनाच्या विरोधात नक्कीच दगडफेक करत नसून, ते देशासाठी दगडफेक करत आहे. पंतप्रधानांनी हे प्रथम समजावून घ्यावे.'

'मोदी साहेबांना सांगू ईच्छितो की, काश्मीरी युवक हे टुरिजम विरोधात नाहीत. टूरिजम ही आमची लाइफ लाईन आहे, यामध्ये कोणतीच शंका नाही. देशासाठी ते दगडफेक करतात, कृपया हे लक्षात घ्या,' असेही अब्दुल्ला म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधानांनी 2 एप्रिल रोजी छेनानी-नाश्री या 9.2 कि.मी. बोगद्याचे उद्घाटन केले. त्यावेळी पंतप्रधानांनी काश्मीरी युवक करत असलेल्या दगडफेकीबाबत वक्तव्य केले होते.

Web Title: Stone-pelting youth giving up life for resolution of Kashmir issue: Farooq Abdullah