सूडबुद्धीचे राजकारण थांबवा ; केजरीवालांचा मोदींवर निशाणा

Stop vendetta politics Kejriwal tells PM Modi
Stop vendetta politics Kejriwal tells PM Modi

नवी दिल्ली : 'स्वराज इंडिया'चे प्रमुख आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते योगेंद्र यादव यांच्या बहिणीच्या मालकीच्या दोन रुग्णालयांवर आयकर विभागाकडून छापेमारीची कारवाई करण्यात आली. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (गुरुवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ''सूडबुद्धीचे राजकारण थांबवा'' अशा शब्दांत त्यांनी मोदींवर ट्विटवरून निशाणा साधला.

योगेंद्र यादव यांच्या बहिणीच्या मालकीच्या दोन रुग्णालयांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली. त्यानंतर ही कारवाई जाणूनबुजून केली असल्याचे आरोप केला जात आहे. या कारवाईवरून केजरीवालांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. ''मोदी सरकारच्या माध्यमातून आयकर विभागाकडून योगेंद्र यादव यांच्या कुटुंबियांना विनाकारण त्रास दिला जात आहे. त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो. मोदी सरकारने हे सर्व थांबावायला हवे'', असे केजरीवाल यांनी ट्विटवर सांगितले. 

याबाबत योगेंद्र यादव यांनी सांगितले, की मोदी सरकार माझ्या कुटुंबियांना लक्ष्य करत आहे. दोन दिवसानंतर माझ्या नऊ दिवसाच्या रेवरी येथील पदयात्रा आणि एमएसपीबाबत (हमीभाव) आंदोलन करणार आहोत. मात्र, त्यापूर्वी माझ्या बहिणीच्या मालकीचे असलेले रुग्णालय-कम-नर्सिंग होमवर आयकर विभागाकडून छापेमारीची कारवाई करण्यात आली. माझ्या घरी शोध घ्या, माझ्या कुटुंबियांना का लक्ष्य करता, असा सवालही योगेंद्र यादव यांनी यावेळी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com