लक्षद्वीपवर पुढील २४ तासांत वादळाची निर्मिती

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

तामिळनाडूत गज वादळाच्या तडाख्यानंतर नव्या वादळाचे संकेत मिळाले आहे. येत्या चोवीस तासांत लक्षद्वीपवर नवे वादळ तयार होत असल्याचा इशारा केंद्रीय वेधशाळेने दिला आहे.

मुंबई- तामिळनाडूत गज वादळाच्या तडाख्यानंतर नव्या वादळाचे संकेत मिळाले आहे. येत्या चोवीस तासांत लक्षद्वीपवर नवे वादळ तयार होत असल्याचा इशारा केंद्रीय वेधशाळेने दिला आहे.

या वादळाचा महाराष्ट्राला धोका नसल्याचे केंद्रीय वेधशाळेचे वैज्ञानिक एम मोहापात्रा यांनी सांगितले. मात्र सावधानतेसाठी महाराष्ट्र आणि गोव्यातील मच्छिमारांना पुढील पाच दिवसांत समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Storm surge in Lakshadweep next 24 hours