'खून का बदला खून' हुतात्मा औरंगजेबच्या गावकऱ्यांची मागणी

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

हुतात्मा औरंगजेबच्या मृत्यूचे पूर्ण देशाला दुखः झाले आहे. हुतात्मा औरंगजेबचे पार्थिव त्यांच्या गावात पोहचवण्यात आले आहे. ईद असतानासुद्धा गावात दुखवटा होता. गावात कोणाच्याही घरात ईद साजरी केली जाणार नसल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर, गावकऱ्यांनी केंद्र सरकारकडे 'खुन का बदला खुन'  अशी मागणी केली आहे. 

श्रीनगर(जम्मू कश्मीर) - हुतात्मा औरंगजेबच्या मृत्यूचे पूर्ण देशाला दुखः झाले आहे. हुतात्मा औरंगजेबचे पार्थिव त्यांच्या गावात पोहचवण्यात आले आहे. ईद असतानासुद्धा गावात दुखवटा होता. गावात कोणाच्याही घरात ईद साजरी केली जाणार नसल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर, गावकऱ्यांनी केंद्र सरकारकडे 'खुन का बदला खुन'  अशी मागणी केली आहे. 

यावेळी, हुतात्मा औरंगजेबाचे वडील मोहम्मद हनीफ यांनी बोलताना सांगितले की, फौजी एक तर मारतो किंवा मरतो, त्यामुळे लोकांनी आपल्या मुलांना सेनेमध्ये पाठवणे बंद केले तर देशाचे रक्षण कोण करणार, आपल्या देशासाठी कोण लढणार. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन केंद्र सरकारकडे त्यांच्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्याची मागणी केली आहे.

14 जूनच्या सकाळी औरंगजब ईदसाठी आपल्या गावाला येणार होते. यादरम्यान, पुलवामाच्या कालम्पोरामधून त्यांचे अपहरण झाले होते. त्यादिवशी संध्याकाळी पोलिस आणि सेनेच्या संयुक्त दलाला त्यांचे पार्थिव कालम्पोरा पासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गुस्सु नावाच्या गावात मिळाले होते. त्यांच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या मारलेल्या होत्या.

Web Title: story aurangzeb indian army soldier funeral jammu and kashmir