गोव्यात पोलिस उपनिरीक्षकाचा अजब प्रकार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

गोवा पोलिस खात्यात स्वतःवरील आरोपाचीच चौकशी स्वतः करण्याचा अजब प्रकार घडला आहे. 

गोवा - पोलिस उपनिरीक्षक व इतरांनी मारहाण केल्याप्रकरणी दिलेल्या तक्रारीची स्वतः त्याच उपनिरीक्षकाने या प्रकरणाचा तपास करून त्यात काहीच तथ्य नसल्याचे तक्रारदाराला उत्तर दिले आहे. गोवा पोलिस खात्यात स्वतःवरील आरोपाचीच चौकशी स्वतः करण्याचा अजब प्रकार घडला आहे. 

सांगे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुदिन रेडकर व इतरांनी अमित नाईक याला मारहाण केल्याची तक्रार अमितच्या पत्नीने दिली होती. या तक्रारीची चौकशी गडेकर यांनीच करून त्यात तथ्य नसल्याचे उत्तर दिले आहे. त्याला ताब्यात घेताना त्याने केलेल्या प्रतिकारावेळी डोक्याला जखमा झाल्या आहेत. तसेच लोकांनीही त्याला गाडीमध्ये घालण्यास पोलिसांना मदत केल्याचे स्पष्टीकरण केले आहे. सांगे पोलिस ठाण्यात त्याला कोणीही मारहाण केली नाही, असे रेडकर यांनी उत्तरात म्हटले आहे.

दरम्यान या घटनेनंतर काही दिवसांनी उपनिरीक्षक रेडकर यांनी एका मृत व्यक्तीची माहिती मिळवताना एका व्यक्तीला लाथा मारल्या होत्या. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी त्याची गोवा राखीव पोलिस दलात बदली करून पोलिस खात्यांतर्गत चौकशी सुरू झाली आहे. उपअधीक्षक सुनिता सावंत चौकशी करत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The strange kind of incident of police subinspector in Goa