प्रशांत किशोर यांनी घेतली मुलायमसिंहांची भेट

वृत्तसंस्था
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

भाजपला पराभूत करण्यासाठी महाआघाडीच्या स्थापनेबाबत कॉंग्रेस पक्ष आग्रही आहे; पण ही आघाडी करताना जागांच्या बाबतीत कोणतीही तडजोड करण्यास पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी नकार दिला आहे.

नवी दिल्ली  -उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडीच्या स्थापनेला वेग आला असून, कॉंग्रेसचे राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आज दिल्लीमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

उभय नेत्यांमध्ये महाआघाडीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे समजते. तत्पूर्वी प्रशांत किशोर यांनी "सप'चे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा केली होती. भाजपला पराभूत करण्यासाठी महाआघाडीच्या स्थापनेबाबत कॉंग्रेस पक्ष आग्रही आहे; पण ही आघाडी करताना जागांच्या बाबतीत कोणतीही तडजोड करण्यास पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी नकार दिला आहे. बिहारमध्ये राबविलेला महाआघाडीचा फॉर्म्युला प्रशांत किशोर यांना उत्तर प्रदेशमध्ये राबवायचा आहे. 

Web Title: Strategist Prashant Kishor meets Mulayam Singh Yadav