'हर कुत्ते का दिन आता है'; 'ठेंगा'ने वाढवली पोलिसांची शान!

वृत्तसंस्था
रविवार, 1 डिसेंबर 2019

देशातील कदाचित पहिला एकमेव भटका कुत्रा असेल, की त्याला प्रशिक्षित केले असेल. उत्तराखंड पोलिसांनी 'ठेंगा'ला केवळ सहा महिन्यांचेच प्रशिक्षण दिले आहे.

डेहराडून : भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्‍न हा नेहमीच गंभीर राहिला आहे. रात्र-बेरात्री टोळक्‍याने फिरणारी भटकी कुत्री पाहिली की नागरिकांना धास्ती बसते. मात्र, हीच भटकी कुत्री आता गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत करणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा

उत्तराखंड पोलिसांच्या श्‍वान पथकात दाखल होणाऱ्या एक भटक्‍या कुत्र्याने परदेशी कुत्र्यांना मागे टाकत सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. तो उत्तराखंड पोलिसांचा उत्कृष्ट गुप्तहेर बनला आहे. 

'हर कुत्ते का दिन आता है' असा संवाद आपण नेहमीच ऐकतो. मात्र, हा संवाद उत्तराखंडच्या एका भटक्‍या कुत्र्याने प्रत्यक्षात आणला आहे. 'ठेंगा' असे या कुत्र्याचे नाव आहे. तो पूर्वी डेहराडूनच्या रस्त्यावर भटकायचा. एक दिवस त्याचे नशीब पालटले. त्याला उत्तराखंड पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रशिक्षण दिले.

Video : मेणबत्तीच्या प्रकाशात 35 महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 

देशातील कदाचित पहिला एकमेव भटका कुत्रा असेल, की त्याला प्रशिक्षित केले असेल. उत्तराखंड पोलिसांनी 'ठेंगा'ला केवळ सहा महिन्यांचेच प्रशिक्षण दिले आहे. या प्रशिक्षणाच्या आधारावर तो परकी कुत्र्यांपेक्षा सरस ठरत आहे. जर्मन शेफर्डसारखा त्याचा स्टॅमिना असल्याचे सांगितले जात आहे.

प्रियांका रेड्डी बलात्कार प्रकरण; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड

त्याला प्रशिक्षण देणारे पोलिस निरीक्षक कमलेश सांगतात, की प्रारंभीच्या काळात 'ठेंगा'ला प्रशिक्षण देताना अडचणी आल्या. मात्र, त्याने शिकण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने सर्वांना मागे टाकले. अतिशय चपळ, वेगात धावणाऱ्या 'ठेंगा'ची वास घेण्याची क्षमतादेखील अन्य कुत्र्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे याच कौशल्यावर आम्ही भर देत आहोत.

धक्कादायक : चक्क हेल्मेट घालून कांदा विक्री; कांद्यासाठी आधारकार्ड तारण

उत्तराखंड पोलिसचे महासंचालक अशोक कुमार म्हणाले की, परदेशातील कुत्र्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, 'ठेंगा'चा खर्च खूपच कमी राहिला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस ग्राउंडवर आयोजित एका कार्यक्रमात 'ठेंगा'चे कारनामे नागरिकांना पाहावयास मिळाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Street dog named Thenga trained for bomb squad by uttarakhand police