सुदृढ मेंदूसाठी स्नायू बळकट करा

वृत्तसंस्था
रविवार, 22 एप्रिल 2018

'स्किझोफ्रेनिया बुलेटिन' मासिकात सर्वेक्षण प्रसिद्ध

नवी दिल्ली: हाताची पकड किती घट्ट आहे, यावरून स्नायूंच्या बळकटीचे मोजमाप करण्यात येते. तसेच, आपल्या मेंदूचे आरोग्य आणि सुदृढता स्नायूंच्या बळकटीवर अवलंबून असते. "स्किझोफ्रेनिया बुलेटिन' या मासिकात याबाबतचे सर्वेक्षण प्रसिद्ध झाले आहे.

बळकट स्नायू व मेंदूचे आरोग्य यांचा परस्परसंबंध असतो, याचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटनमधील चार लाख 75 हजार 397 जणांकडून माहिती गोळा करण्यात आली. मेंदू किती कार्यरत आहे, हे तपासण्यासाठी या लोकांची चाचणी घेण्यात आली. त्यात सामर्थ्यवान लोकांनी चांगली प्रगती दाखविली, असे निष्कर्षात म्हटले आहे. प्रतिसादाचा वेग, तर्कशुद्ध पद्धतीने समस्या सोडविणे व स्मरणशक्तीच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. 55 वर्षांखालील व 55 वर्षांवरील वयोगटातील लोकांमध्ये स्नायू व मेंदू यांचा परस्परसंबंध सातत्याने चांगला असल्याचे आढळून आले, असे मत "एनआयसीएम हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट अँड वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी'नेही नोंदविले आहे. संशोधकांनी या पाहणीत वय, लिंग, वजन, शिक्षण आदी घटक लक्षात घेतले. तसेच, ज्या लोकांमध्ये मेंदूचे कार्य चांगले चालविण्याची क्षमता आहे, अशा लोकांची चाचणीसाठी निवड करण्यात आली.

चाचणीतील निष्कर्ष...
- हाताची पकड मजबूत असणाऱ्यांची दृष्यमान स्मृती चांगली असते.
- स्नायू बळकट करण्यासाठी वजन उचलण्यासारखे व्यायाम करावेत.
- वजन उचलण्याच्या प्रशिक्षणामुळे शारीरिक व मानसिक अवस्था सुधारते.
- बळकट स्नायूंसाठी प्रथिनेयुक्त आहार घ्यावा.
- आहारात चिकन, अंडी, मासे, कडधान्यांचा वापर करावा.

Web Title: Strengthen the muscles for a healthy brain