भारताच्या भूमिकेमुळे दोन्ही देशांत तणाव : इम्रान 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जुलै 2018

कराची, ता. 5 (पीटीआय) : माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, भारत सरकारच्या पाकिस्तानविरोधी आक्रमक भूमिकेमुळे उभय देशांत तणाव कायम राहिल्याचा आरोप पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि नेते इम्रान खान यांनी केला आहे. पाकिस्तानातील राजकीय अडचणी जाणणारा आणि सोडवणारा नेता पाकिस्तानच्या पंतप्रधान निवासस्थानात जाईल, असेही तेहरिक ए इन्साफचे नेते इम्रान खान यांनी नमूद केले. 

पाकिस्तानात 25 जुलैला सार्वत्रिक निवडणुका होत असून, इम्रान खान यांचा पक्ष प्रचारावर पकड मिळवत असल्याचे दिसून येत आहे. "डॉन' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत इम्रान म्हणाले, की शरीफ यांनी भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. एवढेच नाही तर त्यांना (नरेंद्र मोदी) घरी बोलावले होते. मात्र, पाकिस्तानला वेगळे पाडणे हे नरेंद्र मोदी सरकारचे धोरण आहे, असे मला वाटते. त्यांची पाकिस्तानविरोधात खूपच आक्रमक भूमिका आहे. अशा प्रकारच्या भूमिकेवर कोण काय करेल? अशा शब्दांत त्यांनी भारतावर आरोप केला. पाकिस्तानच्या राजकारणावर सैन्याचा प्रभाव राहिल्याचेही इम्रान खान म्हणाले. 
 
Web Title: Stress in both the countries due to India's role says Imran khan