तणावग्रस्त काश्‍मीरमध्ये बंद;जनजीवन विस्कळित

वृत्तसंस्था
रविवार, 30 एप्रिल 2017

लष्कराने ठार केलेल्या दोन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात देण्याची येथील नागरिकांची मागणी होती. या पार्श्‍वभूमीवर, हुर्रियत कॉन्फरन्सच्या दोन्ही गटांचे नेते सईद अली गिलानी आणि मीरवाईझ उमर फारुख तसेच जम्मु काश्‍मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिक यांनी काश्‍मीरमध्ये बंद पुकारला आहे.

श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यामध्ये फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या संपामुळे येथील तणावग्रस्त जनजीवन आणखी विस्कळित झाले आहे.

राज्यातील कुपवाडा जिल्ह्यामध्ये असलेल्या लष्कराच्या एका छावणीवर हल्ला चढविलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करत असताना गोळी लागून एका नागरिकाचा मृत्यु झाल्याच्या घटनेविरोधात फुटीरतावाद्यांनी हा संप पुकारला आहे. जम्मु काश्‍मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमधील बहुसंख्य दुकाने वा सार्वजनिक वाहतुक व्यवस्था पूर्णत: बंद आहेत. मात्र इतर खासगे वाहने वा रिक्षांची वाहतूक सुरळितपणे सुरु आहे. या बंदाचे खोऱ्यामधील इतर जिल्ह्यामध्येही पडसाद उमटले आहेत.

लष्कराने ठार केलेल्या दोन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात देण्याची येथील नागरिकांची मागणी होती. या पार्श्‍वभूमीवर, हुर्रियत कॉन्फरन्सच्या दोन्ही गटांचे नेते सईद अली गिलानी आणि मीरवाईझ उमर फारुख तसेच जम्मु काश्‍मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिक यांनी काश्‍मीरमध्ये बंद पुकारला आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात एका अधिकारी व दोन जवानही हुतात्मा झाले होते.

Web Title: Strike in Kashmir