Breaking News : दिल्ली-NCR मध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, जमीन दोनदा हादरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Earthquake

Breaking News : दिल्ली-NCR मध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, जमीन दोनदा हादरली

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. किमान दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. सुमारे १० सेकंद जमीन हादरत राहिली. त्यामुळे लोक घाबरून घराबाहेर पडले होते. दिल्लीसह हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानात असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाची तीव्रता ६.६ इतकी मोजण्यात आली आहे.

रात्री १० वाजून २० मिनिटानी बहुतेक लोक झोपण्याच्या तयारीत व्यस्त होते. मात्र अचानक जमीन हादरली. प्राथमिक माहितीत या भुंकपाच्या धक्यांमध्ये कोणतेही नुकसान झाल्याची माहिती नाही.

दिल्ली-एनसीआरमधील उंच इमारतींमध्ये लोक प्रचंड घाबरले आहेत. लोक त्यांचे अनुभव सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

दिल्ली-एनसीआरमध्ये यावर्षी तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अचानक सर्व काही हलू लागल्याने लोक भयभित झाले आहेत. त्यामुळे लोक कुटुंबासह घाईघाईने घराबाहेर पडला. एक मिनिटापेक्षा जास्त काळ भूकंपाचे धक्के जाणवल्याचे माहिती लोक सोशल मीडियावर सांगत आहेत.