उमरवरील गोळीबारानंतर शेहला रशीदला जिवे मारण्याची धमकी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्षा शेहला रशीदने माफिया रवी पुजारीविरोधात तक्रार दाखल केली आहे. रवी पुजारीच्या गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप शेहला रशीदने केला आहे. दिल्लीतील जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदवरील गोळीबाराच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटत असतानाच शेहला रशिदला जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

नवी दिल्ली : जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्षा शेहला रशीदने माफिया रवी पुजारीविरोधात तक्रार दाखल केली आहे. रवी पुजारीच्या गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप शेहला रशीदने केला आहे. दिल्लीतील जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदवरील गोळीबाराच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटत असतानाच शेहला रशिदला जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
 

एसएमएसद्वारे मिळालेल्या धमकीचा फोटो ट्विट करुन शेहला रशीदने याबाबत माहिती दिली आहे. तुझं तोंड बंद ठेव नाहीतर आम्ही तुझे तोंड कायमच बंद करु अशा आशयाचा मेसेज तिला पाठवण्यात आल्याचे तिने सांगितले आहे. उमर खालिदवरील गोळीबाराच्या घटनेवर शेहलाने टीका केली होती, म्हणून तिला धमकी मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

उमर खालिद याच्यावर सोमवारी (ता.13) नवी दिल्लीत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारात उमर थोडक्यात बचावला होता. त्यानंतर शेहला रशिद हिला आलेल्या धमकीने खळबळ माजली आहे.

Web Title: Student Activist Shehla Rashid Threatened by Mafia Don Told to Shut Up