शाळेला दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

हैदराबाद - शाळेला दांडी मारल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला लाकडी डस्टरने बेदम मारहाण केली. यात विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. कुकतपल्ली येथील राजधानी शाळेत ही घटना घडली.

हैदराबाद - शाळेला दांडी मारल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला लाकडी डस्टरने बेदम मारहाण केली. यात विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. कुकतपल्ली येथील राजधानी शाळेत ही घटना घडली.

शाळेत आला नाही, याचा राग मनात धरून दहावीतील सुरेश कुमार (वय 14) याला शिक्षकाने डस्टरने मारहाण केली. मारामुळे सुरेशच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. शिक्षक मारत असतानाच तो जमिनीवर कोसळला. त्याला शाळेजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मारहाणीनंतर सुरेशला उलट्या झाल्या व तो कोसळला. मेंदूत झालेल्या गाठी काढण्यासाठी सुरेशवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिल्याचे त्याचे वडील रामजनम प्रसाद यांनी सांगितले. घरून शाळेत जाताना सुरेशची प्रकृती उत्तम होती, असेही ते म्हणाले. शाळेत अनुपस्थित राहिल्याने 500 रुपये दंड भरण्यास सुरेशला शिक्षकांनी सांगितले होते, अशी माहिती त्याच्या आईने दिली.

दरम्यान, सुरेशला मारहाण झाल्याचा आरोप शाळा प्रशासनाने फेटाळून लावला आहे. बेशुद्ध पडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, असा दावा मुख्याध्यापक नरेंद्र यांनी केला. सुरेशच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. सुरेशच्या मेंदूत आधीच गाठी झाल्या होत्या का, याचा तपासही पोलिस करीत आहेत.

Web Title: student badly beaten by teacher