धक्कादायक! भगतसिंग नाटकात फाशीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

मंदसौर : महान क्रांतिकारक शहिद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित नाटकाचा सराव करताना फाशी लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये ही घटना घडली. प्रियांशू मालवीय असे त्या विद्यार्थ्याचे नाव होते. वार्षिक स्नेहसंमेलानातील नाटकाची घरी प्रॅक्टीस करताना हा प्रकार घडला. 

अरेरे! कोरोनाचा शोध लावलेल्या डॉक्टरचाच दुःखद अंत

प्रियांशूच्या शाळेत भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या जीवनावर आधारित नाटक बसविण्यात आले होते. या नाटकात तो शिपायाची भूमिका करत होता. शाळेतील सराव करुन प्रियांशू घरी आला व आपल्या शेतात जाऊन त्याने सराव करायचे ठरवले. सरावावेळी तो भगतसिंग साकारत होता. भगतसिंग यांना फाशी देण्याच्या सीनचा सराव करताना त्याने बांबूच्या सालीचा फाशीसाठी दोर तयार केला. त्यानवंतर सीनची  प्रॅक्टीस करताना त्याच्या गळ्याभोवती ही साल घट्ट आवळली गेली व त्याचा मृत्यू झाला.

मोठी ब्रेकिंग : चीन 20 हजार कोरोनाग्रस्तांना ठार मारणार?; कोर्टाकडे मागणी

घरातील लोकांनी त्याचा शोधायचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा श्वास कोंडला गेलेला होता व हालचाल बंद झाली होती. यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्याजवळ पोलिसांना एक मोबाईल सापडला ज्यात या नाटकाचा व्हिडिओ होता.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student died while practicing Bhagatsingh hanging scene