'जेएनयू'च्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या 

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

मुथुकृष्णन हा हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या करणाऱ्या रोहित वेमुलाला न्याय मिळण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या चळवळीत काम करत होता.

नवी दिल्ली - दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) एका विद्यार्थ्याने नैराश्‍यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली.

या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना दक्षिण दिल्लीतील मुनरिका विहार येथे घडली. मुथुकृष्णन (वय 27) असे मृत विद्याथ्याचे नाव असून, तो जेएनयूमध्ये एमफीलचा विद्यार्थी होता. घटनास्थळी पोलिस पोचले तेव्हा खोलीतील पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वैयक्तिक कारणावरून तो निराश झाला होता आणि त्यातून त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मुथुकृष्णन हा हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या करणाऱ्या रोहित वेमुलाला न्याय मिळण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या चळवळीत काम करत होता. तो अनुसुचित जमातीचा (एससी) होता. तो मुळचा तमिळनाडूतील सालेम येथील रहिवाशी होता. 

Web Title: Student doing MPhil in JNU commits suicide