विद्यार्थ्याच्या मृतदेहाजवळ आढळला 'भूताचा एक डोळा'

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

कोलकताः पश्चिम बंगालमध्ये बारावीत शिकणाऱया विद्यार्थ्याचा मृतदेह एका झाडाला लटकाविलेल्या स्थितीत आढळला आहे. मृतदेहाजवळ 'भूताचा एक डोळा' असे लिहीलेले आढळून आले आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एका विद्यार्थ्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर तेथे 'भूताचा एक डोळा' असे लिहिलेले आढळून आले आहे. याबाबत पुढील तपास करत आहोत.'

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेला विद्यार्थी व येथील अनेकजण मोबाईलवर सतत विविध गेम खेळताना दिसतात. ऑनलाइन गेमच्या माध्यमातून हा प्रकार झाला असावा.

'मृत्युमुखी पडलेला विद्यार्थी हा आमच्या शाळेतील अत्यंत हुषार विद्यार्थी होता. ऑनलाइन गेम खेळण्याच्या प्रकारातून हे कृत्य झाले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोबाईल व ऑनलाइन गेमपासून दूर राहण्यास सांगितले आहे,' असे सेंट अल्फान्सो शाळेतील शिक्षकांनी सांगितले.

Web Title: student found Hanging In Bengal there writtenr Devils One Eye