अमली पदार्थ देऊन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार 

अमली पदार्थ देऊन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार 

चंडीगड : हरियानाच्या महेंद्रगड जिल्ह्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला अमलीपदार्थ देऊन तीन जणांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे, असे पोलिसांनी आज सांगितले. शिकवणीला जाण्यासाठी कनिना बसस्थानकावर उभ्या असलेल्या या मुलीचे दोन दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आले होते. 

पीडित मुलगी ही शाळेतील टॉपर असून सरकारतर्फे तिचा सत्कार करण्यात आला होता. आपल्या मुलीवर तीन जणांनी बलात्कार केल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. या घटनेचा आपल्या मुलीला खूप धक्का बसला असून संशयित अद्यापही मोकाट आहेत. "बेटी बचाव बेटी पढाव' अशी घोषणा सरकार देत आहे, मात्र मुलीच्या शिक्षणाची एवढी मोठी किमत चुकवावी लागत आहे. आरोपी अद्यापही मोकाट असून त्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे, असे पीडित मुलीच्या आईने गावात वार्ताहरांना सांगितले. 

या घटनेबद्दल सांगताना पीडित मुलीची आई म्हणाली की, आपली मुलगी बुधवारी सायंकाळी शिकवणीला जाण्यासाठी बसस्थानकावर उभी होती त्या वेळी तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. 

आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. प्रथम आमची तक्रार नोंदवून घेण्यात टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर दुपारी एक वाजता तक्रार दाखल करून घेतली; मात्र हे प्रकरण रेवारी आणि कनिना यापैकी कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे त्यावरून वाद चालू होता. आम्हाला न्याय हवा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com