शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थ्यांने गमावला डोळा

वृत्तसंस्था
रविवार, 14 मे 2017

येथील एका शाळेतील शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थ्याला केलेल्या शिक्षेत विद्यार्थ्याने डावा डोळा गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

अलाहाबाद (उत्तर प्रदेश) : येथील एका शाळेतील शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थ्याला केलेल्या शिक्षेत विद्यार्थ्याने डावा डोळा गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

येथील सेंट जोसेफ शाळेतील सर्वन तेरेसे (वय 14) या विद्यार्थ्याला नऊ मे रोजी शाळेत येण्यास उशीर झाला होता. उशीर झाल्याने शाळेची बॅग पाठीवर ठेवूनच सर्वन शाळेतील नियमित प्रार्थनेसाठी उभा राहिला. त्यामुळे शाळेचे उपप्राचार्य लेसली कोटिनो यांनी त्याला छडीने मारहाण केली. छडीचा मार सर्वनच्या उजव्या डोळ्याला लागल्याने डोळ्यातून रक्त येऊ लागले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याला लखनौला हलविले असून त्याच्यावर उपचार सुरूच आहेत. वैद्यकीय तपासणीत त्याच्या उजव्या डोळ्याची दृष्टी गेल्याचे आढळून आले आहे. सर्वनच्या कुटुंबियांनी सिव्हिल लाईन्स पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

सर्वन हा त्यांच्या पालकांचा एकुलता एक मुलगा आहे. येत्या महिनाभरात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

Web Title: student loses eyesight after getting canned by teacher