सहावीत शिकणाऱ्या सोनूची थेट मुख्यमंत्री नितीश कुमारांकडे मागणी, म्हणाला...

सहावीत शिकणाऱ्या सोनूची थेट मुख्यमंत्री नितीश कुमारांकडे मागणी
Nitish Kumar Meet Student Sonu Kumar
Nitish Kumar Meet Student Sonu Kumaresakal

नालंदा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एक चिमुकला भेटला. बरं त्याने काय मागितले असेल? काही सूचत का ? जाऊ द्या, आम्हीच तुम्हाला सांगतो. बरं त्या चिमुरड्याचे नाव सोनू कुमार असे आहे. सोनू हा इयत्ता सहावीत शिकत आहे. आज मुख्यमंत्री नितीश कुमार ( Nitish Kumar) हे नालंदाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना सोनू हा शाळकरी मुलगा भेटला. या प्रसंगी त्याने मुख्यमंत्र्यांना त्याला दर्जेदार शिक्षण (Education) पुरवण्याची विनंती केली आहे. सोनू म्हणाला, मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की मला दर्जेदार शिक्षण पुरवावे. (Student Sonu Kumar Urged CM Nitish Kumar To Provide Him Quality Education)

Nitish Kumar Meet Student Sonu Kumar
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा अपमान करतात, राहुल गांधींची टीका

माझ्या वडिलांकडे शिक्षणावर खर्च करण्यासाठी पुरेसा पैसा नाही. ते पूर्ण पैसे दारुवर खर्च करतात. मी बालवाडी ते इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. त्यातून मी माझ्या शिक्षणासाठी पैसे कमवतो. मात्र माझे वडील माझा पैसा दारुवर खर्च करतात. मुख्यमंत्र्यांनी माझी विनंती स्वीकारली आणि अधिकाऱ्यांना मला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यास सांगितले. सरकारी शाळा या दर्जेदार शिक्षण पुरवू शकत नाहीत, असे सोनू कुमार म्हणाला.

Nitish Kumar Meet Student Sonu Kumar
Latur Accident | अहमदपुरात कारच्या धडकेत तरुण ठार, एक जण गंभीर जखमी

बिहारमध्ये दर्जेदार शिक्षण सर्वच मुलांना मिळते असे नाही. शिक्षण हे पूर्णपणे मोफत असायला हवे. त्यामुळे मुलगा असो की मुलगी कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com