रोखण्यासाठी कॉपी... विद्यार्थ्यांच्या डोक्यावर खोकी!

वृत्तसंस्था
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

खोकी डोक्‍यात घालून विद्यार्थी परीक्षा देत असल्याची छायाचित्रे काल व्हायरल झाल्यानंतर कनिष्ठ शिक्षण विभागाचे उपसंचालक एस. सी. पीरजादे यांनी तातडीने महाविद्यालयाला भेट देऊन हा विचित्र प्रयोग थांबविला.

बंगळूर : परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांची अंगझडती घेणे, परीक्षा केंद्रात सीसी टीव्ही लावणे, कठोर पर्यवेक्षक नेमणे आदी उपाय योजतात कर्नाटकमधील एका संस्थेने कॉपी होऊन नये म्हणून विद्यार्थ्यांनी डोक्‍यावर पुठ्ठयाची खोकी डोक्‍यात घालून उत्तरपत्रिका लिहिण्याचा अजब उपाय शोधला आहे. 

खूप वेळ वाट पाहिली अन् ठरवले...

या विचित्र उपायामुळे संस्थेचे अधिकारी अडचणीत आले आहेत. हावेरी येथील भगत कनिष्ठ महाविद्यालयाची सहामाही परीक्षा बुधवारपासून (ता. 16) सुरू झाली. विद्यार्थी परीक्षेसाठी वर्गात जात असताना त्यांच्या हातात पुठ्ठ्याची खोकी सोपविण्यात आली. ती डोक्‍यावर घालूनच उत्तरपत्रिका लिहिणे अनिवार्य करण्यात आले होते. मुलांचा चेहरा दिसेल एवढे भोक या खोक्‍याच्या एका बाजूला ठेवलेले होते. यातून विद्यार्थ्यांना केवळ समोरचे दिसेल अशी सोय केली होती. उत्तरपत्रिका सोडून विद्यार्थ्यांनी आजुबाजुला पाहू नये, अशी रचना केलेली होती. 

महाविद्यालयाचे प्रशासक सतीश यांच्या सुपिक डोक्‍यातील ही अजब कल्पना प्रत्यक्षात आली. अशा अवघडलेल्या स्थितीत परीक्षा देणे विद्यार्थ्यांना त्रासदायक असले तरी नियम न मोडण्याची सक्ती त्यांच्यावर करण्यात आली होती. खोकी डोक्‍यात घालून विद्यार्थी परीक्षा देत असल्याची छायाचित्रे काल व्हायरल झाल्यानंतर कनिष्ठ शिक्षण विभागाचे उपसंचालक एस. सी. पीरजादे यांनी तातडीने महाविद्यालयाला भेट देऊन हा विचित्र प्रयोग थांबविला. राज्य सरकारने या महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

#KamleshTiwariMurder 'त्या' तिघांनीच केली कमलेश तिवारींची हत्या

या घटनेनंतर सरकारने महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून लिखित स्वरूपात खुलासा मागविला आहे. जर भविष्यात अशा प्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास महाविद्यालयाचा परवाना रद्द करण्यात येईल. 
- एस. एस. पीरजादे, उपसंचालक, कनिष्ठ शिक्षण विभाग, कर्नाटक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students were forced to wear paper boxes to prevent cheating in karnataka