Video : बदली झाली हे कळलं अन् पोलिस धावतच सुटला!

Etawah-Police
Etawah-Police

इटावा : उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकीच मजेशीर घटना घडलीय. एका पोलिस उपनिरीक्षकाची बदली झाली. त्याचा निषेध म्हणून त्यानं अनोखा प्रकार करण्याचा प्रयत्न केला. त्यानं चक्क 65 किलोमीटरची दौड करण्याचा निर्धार केला आणि तो युनिफॉर्मवरच धावत सुटला. 

पोलिस उपनिरीक्षक विजय प्रताप यांच्या बदलीची ऑर्डर निघाली. पण, विजय प्रताप यांना ही बदली मान्य नव्हती. वरिष्ठांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून, ही बदली केल्याचा आरोप विजय प्रताप यांनी केला. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी 65 किलोमीटरची दौड करण्याचा निर्धार व्यक्त केला.

केवळ निर्धार व्यक्त करून विजय प्रताप थांबले नाहीत तर, त्यांनी युनिफॉर्मवरच धावायला सुरुवात केली. दुदैवाने काही अंतर धावल्यानंतर विजय प्रताप रस्त्यावरच बेशुद्ध पडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. इटावा पोलिस मुख्यालयात ते काम करत होते. त्यांची बदली बिठोली पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यावर ते नाराज होते. 

मुख्यालयापासून बिठोली पोलिस ठाण्याचे अंतर 65 किलोमीटर आहे. हे अंतर धावत पार करण्याचा निर्धार केला आणि ते धावत सुटले. रस्त्यावर अशा पद्धतीने धावत सुटलेला पोलिस पाहून शहरात तो चेष्टेचा विषय ठरला. अनेकांनी विजय प्रताप यांचा धावतानाचा व्हिडिओ शूट केला.

काही अंतर धावल्यानंतर विजय प्रताप रस्त्यावर बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. विजय प्रताप यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर मात्र पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि संपूर्ण प्रकाराचा चौकशी सुरू केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com